mahabaleshwar temperature drops below 10 degrees celsius today saam tv
महाराष्ट्र

Winter Chill : दिवाळीच्या सुट्ट्या आणि गुलाबी थंडीची मजा; महाबळेश्वर १० अंशांवर

सकाळपासून रात्रीपर्यंत महाबळेश्वरची बाजारपेठ पर्यटकांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे.

ओंकार कदम

Mahabaleshwar Weather News :

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेले महाबळेश्वर मध्ये गुलाबी थंडी पडायला आता सुरवात झाली आहे. सध्या महाबळेश्वरचा पारा ९ ते १० अंशांपर्यंत खाली आला आहे. दरम्यान महाबळेश्वरची गुलाबी थंडी आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत. (Maharashtra News)

महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी दर वर्षी लाखो पर्यटक महाबळेश्र्वरला येत असतात. गेल्या काही दिवसांपासून येथील पारा घसरत चालला आहे. महाबळेश्वर येथील वेण्णालेक व लिंगमळा परिसरात थंडीचे प्रमाण हळू हळू वाढत आहे.

सध्या महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय पॉईंट येथे पर्यटकांची वर्दळ आहे. वेण्णा लेक परिसरात पर्यटक घाेडे सवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. गुलाबी थंडीत मक्याचे कणीस आणि वेगवेगळे पदार्थांचा आनंद पर्यटक महाबळेश्वरात लुटत आहेत. दरम्यान वातावरणातील बदलांमुळे येथील स्ट्राॅबेरी उत्पादक मात्र चिंतेत पडले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Taloda News : मृत्यूनंतरही यातना संपेना; पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा जोरदार इशारा; विरोधकांनो, शिवसेना कधीही फुटणार नाही|VIDEO

Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, Video व्हायरल

Famous Model Death: हायवेवर कारला हरणाची धडक लागून अपघात, महिनाभर उपचार, पण प्रसिद्ध मॉडेलची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT