Mva Seat Sharing Formula for Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? जागावाटपात काँग्रेसच मोठा भाऊ? कोण किती जागांवर निवडणूक लढणार? वाचा...

Mva Seat Sharing Formula for Maharashtra: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातच कोण किती जागांवर निवडणूक लढवणार, जाणून घेऊ...

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. त्यापार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटप आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हा फॉर्म्युला काय आहे हेच जाणून घेऊ...

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 105-135 जागांवर तयारी सुरु केली आहे. तर ठाकरे गटाची 95 ते 100 जागांवर लढण्याची तयारी आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 80 ते 90 जागांसाठी आग्रह आहे.

जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या 2 बैठका झाल्या आहेत. तर तिसरी बैठक गणेशोत्सवानंतर 20 सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जागांच्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे विदर्भातील 62 पैकी 29 जागांवर एकमत झाल्याने महाविका आघाडीचं टेंशन कमी झालंय. दुसरीकडे मुंबईतील जागांवरूनही महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईत कुणाचा किती जागांवर दावा आहे, जाणून घेऊ..

मुंबईतील जागांवरून रस्सीखेच

मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. तर मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर काँग्रेसचा दावा आहे. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांसाठी आग्रह आहे.

दरम्यान, लोकसभेच्या यशानंतर विधानसभेलाही जागावाटपात आघाडी घेत महायुतीला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालीय. त्यातच आता जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय. मात्र लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी विधानसभेलाही जागा वाटपाचा प्रश्न निकाली काढून प्रचारात आघाडी घेणार की, अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेचं गु-हाळ सुरूच राहणार याची उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT