Shinde loyalist ministers boycott Maharashtra cabinet meeting, exposing internal rift in Maha coalition over deputy minister posts. Uday Samant’s remarks intensify political tension within the alliance. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

Rift in Maha Coalition Deepens: मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी उघड केलीय. मात्र महायुतीत या नाराजीनाट्याची सुरुवात कशी झाली? सामंतांच्या कोणत्या दाव्यानं महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय?

Suprim Maskar

महायुतीत पालकमंत्रिपदावरून नाराजी नाट्य रंगलंय. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री जाहीर झाले नसले तरी ध्वजारोहणाचा मान मात्र अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या मंत्र्यांना मिळालाय़. त्यामुळेच की का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह रायगडचे भरत गोगावले आणि नाशिकचे दादा भुसे यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली. आणि त्यामुळे या तिघांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. या नाराजीनाट्याचा नवा अध्याय नेमका कसा सुरु झाला?

6 ऑगस्ट

एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात मोदी आणि शाहांची भेट घेतली

त्यानंतर पालकमंत्रिपदावरून शिंदे आणि तटकरेंची बैठक

10 ऑगस्ट

एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर रवाना

11 ऑगस्ट

रायगडमध्ये तटकरे आणि नाशिकमध्ये महाजनांना ध्वजारोहणाचा मान

12 ऑगस्ट

शिंदें, गोगावले आणि दादा भुसेंची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

गोगावेलेंनी तर कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारत थेट दिल्ली गाठलीय. मात्र आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. आज ना उद्या पालकमंत्रिपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.- हे कमी होतं की काय...उद्योगमंत्री उदय सामंतांनी महायुतीबाबत मोठं विधान करून पालकमंत्रिपदाच्या वादात तेल ओतलं....मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळेच महायुतीचं सरकार आल्याचा दावा सामंतांनी केला.

महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगण्यात येत असलं तरी महायुतीतील अंतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही. शिंदेंचे आठ दिवसात दोनदा दिल्ली दौरा.. भाजपमध्य जोरदार इनकमिंग सुरू असल्य़ानं वाढलेली अस्वस्थता...आणि अधिकारांवर आलेली गदा यामुळे एकनाथ शिंदेंची कोंडी झालीय. तर दुसरीकडे गायकवाडांसारखे आमदार थेट पोस्टरवरून शिंदेंचा फोटोच गायब करत असल्यामुळे शिंदेसेनेतही अंतर्गत कलह सुरू असल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT