महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताच मध्यप्रदेश सरकारने बंद केल्या सीमा! SaamTvNews
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताच मध्यप्रदेश सरकारने बंद केल्या सीमा!

RTPCR चाचणी केल्याशिवाय मध्य प्रदेशात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येत नाही.

अरुण जोशी

अमरावती : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहून मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्राच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.

हे देखील पहा :

मध्यप्रदेश शासन सातत्याने महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवर लक्ष्य ठेवून आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणात होणारी वाढ पाहता व कोरोनाचे गांभीर्य पाहता मध्यप्रदेश शासनाने आपल्या सर्व सीमा सील केल्या आहेत. धारणीपासून अवघ्या 12 किमी अंतरावर असलेल्या देडतलाई येथे पोलीस आणि डॉक्टरांचा विशेष बंदोबस्त करून सीमा सील करण्यात आली आहे.

RTPCR चाचणी केल्याशिवाय मध्य प्रदेशात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येत नाही. महाराष्ट्राच्या बसेस मध्य प्रदेशात प्रवेश करू शकत नाहीत आणि मध्य प्रदेश बससेवा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात येऊ शकत नाही. अशाप्रकारे मध्य प्रदेश शासनाने आपल्या सुरक्षेसाठी महाराष्ट्राच्या सीमा सील केल्या असून तपास अधिक तीव्र केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT