बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा उद्या ३ जून रोजी आठवा स्मृतिदिन आहे. मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्मृतिदिनानिमित्त गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची पाहणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज केली.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्याच्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी हजारो मुंडे समर्थक येत असतात. मात्र, मागिल दोन वर्षाच्या कोरोना (Corona) काळात स्मृतिदिनाला मुंडे समर्थकांना गडावर यायला मिळालं नव्हतं.
त्यामुळे आता २ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी उद्या मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गडावर येण्याची शक्यता आहे. अशातच आता उद्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) देखील गोपीनाथ गडावर येणार असल्याची माहिती भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाची सर्व मुंडे समर्थकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
हे देखील पाहा -
तसंच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन हा संघर्ष दिन म्हणून साजरा करतो. विविध क्षेत्रामध्ये संघर्ष करणाऱ्या व्यक्तींचा उद्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. अशी माहितीही भाजप नेत्या पंकजा मुंडें यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पंकजा मुंडे या गोपिनाथ गडावर जमलेल्या आपल्या हजारो समर्थकांना मार्गदर्शन करत असतात. अशातच आता असणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांबाबत काही भाष्य करणार का? पंकजा मुंडे विधान परिषदेची उमेदवारी भाजप देणार का ? पंकजा मुंडे उद्या नेमकं काय बोलणार? याबाबत जाणून घेण्याची मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.
यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांनी भाजपकडून ऐनवेळी उमेदवारी नाकारन्यात आली होती. यावेळी त्यांनी याच गडावरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि उद्याचा गोपीनाथ गडावरील कार्यक्रम हा जुळून आल्याने त्या काय भूमिका घेणार याकडे मुंडे समर्थकांचं लक्ष आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.