Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: माढा, सोलापूरच्या जागा कोण जिंकणार?, लोकसभा निवडणुकांबाबत शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना तीन पक्ष एकत्रित येवून माढा आणि सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. आमची निती साफ आहे. त्यामुळे या दोन्ही लोकसभेच्या जागांसह विधानसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज व्यक्त केला. या निडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकेल असे विचारले असता, आताच सांगता येणार नाही असे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच राज्यांच्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत. ती पध्दत चुकीची आहे. निवडणुकीतील आत्मविश्वास ढळल्याचे दिसून येत आहे. लोक अशाप्रकारच्या आमिषाला बळी पडणार नाही‌त. पाच राज्यामध्ये भाजप विरोधी मुख्यमंत्री असतील असे भाकित राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यातील कापशी वाडी येथे शेतकरी मेळावा झाला. मेळाव्या पूर्वी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी मोदीवर टिकास्त्र सोडले.

मंत्री अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत

अजित पवार गटाच्या एका मंत्र्याबाबत शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आलेले दिसतील असे विधान मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर आज शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाना साधत ते पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत असा दावा केला आहे. मी नुकताच अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. मतदारसंघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांनी, अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, असं सांगितल्याचं ते म्हणाले.

सत्तर वर्षांच्या परंपरेनुसार आम्ही दिवाळीला एकत्र येतो

दिवाळी सण हा आनंदाचा असतो. आनंदाच्या दिवसांमध्ये पवार कुटुंबीय एकत्र येत असतात. आमची ही परंपरा गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. आम्ही पवार कुटुंबीय कोणते ही राजकीय लवलेश न ठेवता कुटुंब म्हणून एकत्र येत असतो. ही परंपरा आम्ही सर्वांनी कायम ठेवली आहे. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याला कोणताही राजकीय लवलेश देखील नव्हता, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

SCROLL FOR NEXT