Nagar Panchayat election: माढ्यात आघाडीमध्येच लढत; काँग्रेसला 12 शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 4 जागा  Saam TV
महाराष्ट्र

Nagar Panchayat election: माढ्यात आघाडीमध्येच लढत; काँग्रेसला 12 शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 4 जागा

माळशिरस नगरपंचायतीमध्ये भाजप ने 10 जागा जिंकत आपली सत्ता कायम राखली आहे. भाजप आमदार मोहिते पाटील आणि आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भारत नागणे

सोलापूर : सोलापूरमधील नगर नगरपंचायतींचे निकाल स्पष्ट झाले असून माढा नगरपंचायती मध्ये महाविकास आघाडीमध्येच (MVA) लढत झाली आहे. काँग्रेस माजी आमदार धनाजी साठे यांनी 12 जागा जिंकत आपले सत्ता कायम राखली आहे. तर शिवसेना 3 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान माळशिरस नगरपंचायती मध्ये भाजप ने 10 जागा जिंकत आपली सत्ता कायम राखली आहे. भाजप आमदार मोहिते पाटील आणि आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 2 जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर मनसे एक तर 4 अपक्ष विजयी झाले आहेत.

म्हाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये अपक्षांनी 9 जागा जिंकत आघाडी घेतली तर राष्ट्रवादी 6 आणि भाजप काँग्रेस ने प्रत्येकी एक एक जागा जिंकली आहे. तर नातेपुते मध्ये स्थानिक आघाडी च्या हातात सत्ता आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

5 Uses of Used Tea Powder: चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर फेकून देताय? जाणून घ्या तिचे हे 5 जबरदस्त फायदे, घर होईल चकाचक!

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभेत हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यात टोलेबाजी

SCROLL FOR NEXT