Uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश

Madha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 लाख धनगर समाज आहे. त्यामुळे ओबीसी बहुजन पार्टीला लक्ष्मण हाके यांच्या येण्याने मोठा फायदा होईल असं म्हटलं जातंय.

साम टिव्ही ब्युरो

माढा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील लक्ष्मण हाके ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश करणार आहेत. प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीत हाकेंचा प्रवेश पार पडणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके इच्छुक आहेत. प्रकाश शेंडगेंकडून लक्ष्मण हाके यांना उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. हाके माढा लोकसभामधून धनगर समाजाचा मोठा चेहरा आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 लाख धनगर समाज आहे. त्यामुळे ओबीसी बहुजन पार्टीला लक्ष्मण हाके यांच्या येण्याने मोठा फायदा होईल असं म्हटलं जातंय.

सध्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही लोकसभेच्या मैदानात आहेत. वंचितचे रमेश बारसकर देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. खासदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. अशात तिकीट न मिळाल्यास किंवा नाराजी असल्यास अनेक नेते मंडळी आणि पदाधिकारी त्या पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसतायत.

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारांची आज चौथी यादी जाहीर होणार आहे. याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपसह सत्तेत सहभाग घेतल्यानंतर आतापर्यंत ठाकरे गटाला अनेक धक्के मिळालेत. त्यात आता ठाकरे गटासाठी लक्ष्मण हाकेंची एक्झीट देखील मोठा धक्का मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील बालगंधर्व चौकात एन एस यु आय चा आंदोलन

Crime News : संतापजनक! घरात घुसून तरुणीवर दोन वेळा बलात्कार; कुटुंबाला संपवण्याची धमकी

Akshay Kumar: अक्षय कुमारचा १ फोटो काढायला पापाराझींना मिळतात 'इतके' रुपये; अभिनेत्यानेच सांगितला आकडा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; चौघांचा जागीच मृत्यू

LPG Shortage: टंचाई नाही मग रांगा का? सिलिंडरच्या टंचाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा भडका

SCROLL FOR NEXT