Maharashtra Assembly Election 2024  Saamtv
महाराष्ट्र

Madha Assembly : ३० वर्षानंतर माढ्याला नवा आमदार मिळणार, ६ टर्म आमदार राहिलेल्या बबनदादांचे संकेत

Namdeo Kumbhar

Madha Assembly constituency : लोकसभा असो, अथवा विधानसभा, माढा मतदारसंघ चर्चेतच असतो. सोलापूरमधील सर्वाधिक राजकीय घडामोडीचा (Maharashtra Solapur Politics) मतदारसंघ म्हणून माढ्याची ख्याती! खासदार कुणीही होऊ द्या... माढा विधानसभा मतदारसंघावर बबनदादा शिंदे यांची भक्कम पकड आहे. ३० वर्षांपासून बबनदादा शिंदे (aamdar Babanrao Vitthalrao Shinde) माढ्याचे आमदार राहिलेत. पण आता माढ्याचा आमदार बदलणार आहे. होय! कारण, स्वत: बबनदादा शिंदे यांनीच, तसे संकेत दिलेत. (maharashtra assembly election 2024)

बबनदादा शिंदे (MLA babandada shinde) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण निवडणूक लढणार नसल्याचं एकप्रकारे जाहीर केले आहे. बबनदादा शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे माढा मतदारसंघाला १९९५ नंतर पहिल्यांदाच नवा आमदार मिळणार आहे. माढा विधानसभेचे गेले 30 वर्षे बबनदादा शिंदे (Madha Vidhansabha Election) यांनी प्रतिनिधित्व केलेय. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदललेल्या घडामोडीनंतर शरद पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या आमदार बबनदादा शिंदे यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण आता पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधली आहे. (2024 Maharashtra Legislative Assembly election)

बबनदादा शिंदे यांनी नुकतीच शरद पवार यांनी भेट घेतली. रणजित शिंदे यांच्यासाठी बबनदादा शिंदे यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारसाहेबांना भेटायला गेलो होतो. तिकिट मिळेल की नाही याबाबत माहिती नाही. पण आगामी निवडणुकीमध्ये रणजितला साहेबांना तिकिट दिले तर ठीक. नाहीतर त्याला मी अपक्ष उभं करणार आहे.
आमदार बबनदादा शिंदे

बबनदादा शिंदे यांची निवडणुकीतून माघार का?

माझे वय झाले आहे. प्रकृतीच्या कारणामुळं मी यावेळेस विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळं रणजित शिंदे हेच माढा विधानसभेची निवडक लढवणार आहेत. त्यांना एकवेळ जनतेनं संधी द्यावी, असं आवाहन काही दिवसांपूर्वी आमदार बबनदादा शिंदे यांनी केलं होतं.

बबनदादांचे माढ्यावर एकहाती वर्चस्व -

माढ्याच्या राजकारणात बबनदादा शिंदे यांचाच दबदबा राहिलाय. १९९५ मध्ये बबनदादा शिंदे पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विधानसभा गाठली. त्यावेळी युतीच्या सरकाराला त्यांनी पाठिंबा दिला होता. पण त्याच काळात शरद पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून बबनदादा शरद पवार यांच्यासोबत आहेत. १९९९ च्या निवडणुकीत बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तेव्हापासून ते २०१९ च्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेत. जवळपास ३० वर्षे बबनदादा शिंदे माढ्याचे आमदार राहिले आहेत. पण आता वाढते वय, त्याशिवाय मुलाला राजकारणात स्थिरावण्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलगा रणजितला मैदानात उतरवणार आहेत. कोणत्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही तर ते रणजित शिंदे यांना अपक्ष उभं करणार आहेत.

माढ्याची जनता कुणाला आमदार करणार?

बबनदादा शिंदे यांच्यानंतर माढ्यात कोण आमदार होणार? याची उत्सुकता लागली आहे. रणजित मोहिते पाटील, रणजित शिंदे, अभिजित पाटील, धनराज शिंदे, शिवतेसिंह मोहिते पाटील,शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, मीनल साठे , संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे आणि उमेश परिचारक हे सर्व नेतेमंडळी माढ्याच्या मैदानात उतरण्यास इच्छूक आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कोण कोण आमदार राहिलंय?

१९६२ - काशिनाथ बापू असवारे (काँग्रेस)

१९६७ - एसएम पाटील (Peasants and Workers Party of India)

१९७२ - विठ्ठलराव शिंदे (काँग्रेस)

१९७८ - कृष्णराव परबत (अपक्ष)

१९८० - धनाजीराव साठे (काँग्रेस)

१९८५ - पांडुरंग पाटील (अपक्ष)

१९९० - पांडुरंग पाटील (काँग्रेस)

१९९५ - बबनराव शिंदे (अपक्ष)

१९९९,२००४,२००९,२०१४,२०१९ - बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, काय आहे कारण?

Maharashtra Politics : आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातून उड्या, धनगरांच्या ST आरक्षणाला आदिवासींचा विरोध

Sharad Pawar: 'आरक्षणाची मर्यादा वाढवा', शरद पवार यांनी सांगितला आरक्षणाचा नवीन फॉर्म्युला; वाचा...

Maharashtra News Live Updates: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड

Finance Astro Tips: आठवड्यातील 'या' दिवशी आर्थिक व्यवहार करणं टाळा

SCROLL FOR NEXT