Women react strongly as LPG cylinder prices rise again, increasing pressure on household budgets across Maharashtra. Saam tv
महाराष्ट्र

LPG Price Hike: गॅसच्या दरात दुसऱ्यांदा वाढ, महिलांचा संताप 'लाडकीचे पैसे नको, सिलेंडर स्वस्त करा'

Lpg Price Hike India June 2026 Cylinder Cost Increase: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली असून अवघ्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. 29 रुपयांच्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींवर आर्थिक ताण वाढला आहे. महागाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे.

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

राज्यात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय. सरकारनं गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ केलीये. एकीकडे इंधन दरवाढ आणि दुसरीकडे सिलेंडरही महाग झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. गॅस दरवाढीचे राजकीय पडसादही उमटलेत...

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागलीये. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे होरपळणाऱ्या जनतेला आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मोठा फटका बसलाय. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात थेट 29 रुपयांची वाढ केलीये. त्यामुळे आगामी काळात राज्यात महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत तेल कंपन्यांकडून एकूण 89 रुपयांची वाढ करण्यात आलीये. तेल कंपन्यांनी याआधी 7 मार्च 2026 मध्ये प्रति सिलिंडर 60 रुपयांची वाढ होऊन 912.50 रुपये झाले. त्यानंतर आता 7 जूनला घरगुती सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ होऊन 941.50 रुपये किंमत झाली आहे.

अवघ्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. तेल कंपन्यांच्या दरवाढीविरोधात राज्यभरातील गृहिणींनी तीव्र संताप व्यक्त केलाय. वाढत्या गॅस दरवाढीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. सत्ताधाऱ्यांना महागाईची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा विरोधकांनी दिलाय. तर 'जगात युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केली आहे.

घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यानं आता सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही देशातील कंपन्या तोटा भरून काढण्यासाठी वारंवार इंधनांच्या किंमतीत वाढ करत आहेत. त्यामुळे 'अच्छे दिन' येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या ताटातील घास मात्र दिवसेंदिवस महाग होत चाललाय. सरकार या महागाईच्या 'राक्षसाला' नियंत्रणात आणून दिलासाची फुंकर मारणार की यापुढेही इंधन दरवाढीचा चटका सामान्य जनतेला बसत राहणार ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जय भीम'च्या घोषणा ही अराजकता आहे का? अभिजीत दिपकेंचा CM फडणवीसांना सवाल

Maharashtra News Live Update: बारामतीत पावसाला सुरूवात, नागरिकांची उडाली तारांबळ

मैत्रीण रुमच्या बाहेर पडली अन्...; कॉंग्रेस नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, काय घडलं?

Mumbai Crime: मुंबईमध्ये रक्तरंजित थरार! भरदिवसा चौघांवर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

शत्रूंपासून सावध राहा, किरकोळ खर्च टाळा; ५ राशींच्या लोकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार

SCROLL FOR NEXT