Gas Cylinder Blast Video Saam TV
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast Video : कारमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; अग्नितांडव पाहून नागरिकांमध्ये घबराट

Chhatrapati Sambhaji Nagar Fire News : स्फोट झाला तेव्हा अगदी १० किलोमीटरपर्यंत याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सदर घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.

Ruchika Jadhav

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलंब्री तालुक्यातल्या निमखेडा येथे सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आहे. कारमध्ये सिलिंडरची टाकी भरताना हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कारमधून गॅस सिलिंडर टाकीची वाहतूक केली जात होती. त्यावेळी टाकीचा अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलिंडर टाकी कारमधून उडून थेट बाहेर पडली आणि आगीचा एकच भडका उडाला.

स्फोट झाला तेव्हा अगदी १० किलोमीटरपर्यंत याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सदर घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र एका दुकानाचे यात मोठे नुकसान झाल्याचे समजलेय.

कारमधून घरगुती वापरण्याचा गॅस सिलिंडर घेऊन जात असताना हा स्फोट झालाय. कारमध्ये असतानाच सिलिंडर लिक झाला होता. कुणाला काही कळणार तितक्यात सिलिंडरचा स्फोट होऊन थेट कारमधून बाहेर समोर एका दुकानावर आदळला. दुकानावर आदळल्यानंतर या सिलिंडरने पेट घेतला. यामध्ये दुकान आणि त्यातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics: संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंची गाडी कुणाच्या नावावर ? अंबादास दानवेंचा सवाल|VIDEO

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं भाजपचं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT