महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG Cylinder च्या किंमतीत वाढ! Saam Tv
महाराष्ट्र

महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG Cylinder च्या किंमतीत वाढ!

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या LPG Cylinder किंमती परत वाढवल्या आहेत.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सर्वसामान्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या LPG Cylinder किंमती परत वाढवल्या आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC ने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव प्रति सिलिंडर ४३.५ रुपयांपर्यंत वाढवले आहेत.

हे देखील पहा -

यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव १६९३ रुपयांवरून १७३६.५ रुपये प्रति सिलेंडर इतकी झाली आहे. तेल कंपन्यांनी १४.२ किलो विनाअनुदानित घर वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरचे भाव वाढवले नाहीत. त्यांच्या भावात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीमध्ये १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे भाव ८८४.५० रुपये आहे.

मागील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या भावात २५ रुपयांनी वाढ केली होती. सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या भावात वाढ केली आहे. सर्वाधिक वाढ दिल्लीमध्ये ४३.५० रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅसचे भाव ४३.५ रुपयांनी वाढून १७३६.५ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव ३५ रुपयांनी वाढून १८०५.५ रुपये झाले आहे. मुंबईमध्ये भावात ३५.५ रुपयांनी वाढून १६८५ रुपये आणि चेन्नईत ३६.५ ते १८६७.५ रुपये प्रति सिलेंडर इतके झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT