Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : ऑनलाइन गेमने तरुणाचा घेतला जीव; धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं

Online Game Crime News : गेमच्या नादाला लागून एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : अनेक तरुण फोनच्या आणि ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेले आहेत. तरुण मुलं तासंतास हातात फोन घेऊन गेम खेळताना दिसतात. याचे त्यांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. अनेक मुलं अशा गेम्समध्ये पैसे देखील गुंतवतात. पैसे हारल्यावर त्यांना मोठं नैराश्य येतं. अशात आता गेमच्या नादाला लागून एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. (Losied Money In Online Games)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे ऑनलाइन गेममध्ये (Online Game) पैसे हारल्याच्या तणावात उच्चशिक्षित 23 वर्षीय तरुणाने स्वत:चं जीवन संपवलं आहे. एका ऑनलाइन गेममध्ये तो ५० हजार रुपये हारला होता. त्याने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच नातावेईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन टाहो फोडला.

याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. गौरव चंद्रकांत पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे मेकॅनिकल डिप्लोमापर्यंत शिक्षण पूर्ण झालं होतं. मुलाच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांकडून पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या

दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. तसेच हत्येनंतर मुलाने आत्महत्या केल्याचा बनावही रचण्यात आल्याचा दुर्देवी प्रकार घडला आहे. भोकरदन तालुक्यातील विझोरा गावातील ही घटना असून परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वडिल गजानन आढाव यांची अधिक चौकशी केली. यावेळी आपणच आदित्यचा (मृत मुलगा) गळा आवळून खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यानंतर संगिताबाई आढाव यांच्या फिर्यादीवरुन पती गजानन आढाव यांच्य विरुद्ध मुलाचा खुन केल्या प्रकरणी पारध पोलिस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी अधिक तपास पोलीस करत असून गजानन आढाव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडी मोर्चा

Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

SCROLL FOR NEXT