महाराष्ट्र

Nashik Crime News : मुख्य अभियंता गणेश वाघविरोधात लूकआऊट नोटीस, 1 कोटी लाच प्रकरणी कारवाई

Ganesh Wagh Case : एमआयडीसी धुळ्याचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ पाच दिवसांनंतरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडलेला नाही.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

नाशिकमधील फरार लाचखोर अभियंता गणेश वाघविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ५ दिवसांनंतरही गणेश वाघ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडेना. त्यामुळेच गणेश वाघला शोधण्यासाठी देशभरात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

अहमदनगरच्या बहुचर्चित एक कोटीच्या लाच प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला एमआयडीसी धुळ्याचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ पाच दिवसांनंतरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी देशभरात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आलीय.

तसेच आणखी तीन पथके संशयित ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. ३ नोव्हेंबरला नगर एमआयडीसीजवळ बायपास रस्त्यावर एक कोटीची लाच घेताना सहायक अभियंता अमित गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. यामध्ये गणेश वाघ मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं होतं.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. मात्र गायकवाडला अटक झाल्याचं कळताच गणेश वाघ फरार झाला होता. त्यामुळे नव्याने तीन पथके वाघ शोधासाठी गेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT