Lonavla : घटस्थापनेला उघडणार कार्ल्यातील एकविरा देवी मंदिर दिलीप कांबळे
महाराष्ट्र

Lonavla : घटस्थापनेला उघडणार कार्ल्यातील एकविरा देवी मंदिर

कोळी आग्री बांधवांचं कुलदैवत असणाऱ्या लोणावळ्यातील कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिराचे दरवाजे घटस्थापनेला उघडणार, नवरात्रीचा कार्यक्रम जाहिर...

दिलीप कांबळे

मावळ : मावळ मधील कार्ला येथील जगप्रसिद्ध लेण्यांच्या कुशीत वसलेल्या एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आश्विन शु. प्रतिपदेला म्हणजेच सात ऑक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार असून महानवमीचा होम तेरा ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य पुजारी संजय गोविलकर यांनी दिली आहे.

हे देखील पहा :

नुकतेच राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आणि मंदिरे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव कार्यक्रमांची माहिती गोविलकर यांनी दिली. गतवर्षी कोरोनामुळे देवीचा हा उत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात आला होता. परंतु या वर्षी सालाबादप्रमाणे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य प्रशासक व मुंबई उच्च न्यायालयाचे अधीक्षक केतन त्रिवेदी यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Kalyan Tragedy: तो व्हिडिओ अखेरचा ठरला; काळू नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT