satara crime news, lonand police saam tv
महाराष्ट्र

Satara : बहिणीस त्रास दिल्यानं पाडेगावातील युवकाचा खून; लाेणंद पाेलिसांनी काैशल्याने केलं चाैघांना अटक

अत्यंत काैशल्याने लाेणंद पाेलिसांनी खूनाचा गुन्हा उघडकीस आणल्याने सातारा पाेलिस दलावर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

Siddharth Latkar

सातारा : बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणास्तव युवकाचा गळा चिरून खुन झाल्याची माहिती लाेणंद पाेलिसांच्या तपासात सातारा (satara) जिल्ह्यात नुकतीच समाेर आली आहे. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी चार युवकांना अटक केली आहे. तसेच पाेलिसांनी एका अल्पवयीन मुलास देखील ताब्यात घेतलं आहे. (Satara Crime News)

मे महिन्यात राहुल मोहिते या युवकाचा पाडेगाव (ता. खंडाळा) येथे गळा चिरून खून झाला होता. या घटनेनंतर लोणंद पोलिसांनी संशयित आराेपींचा तपास सुरु केला हाेता. विशेष म्हणजे या खून प्रकरणात काेणतेच धागेदाेरे पाेलिसांना मिळाले नव्हते. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते.

गेले तीन महिन्यांपासून लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे शोध घेत होते. त्यात त्यांना यश आले आहे. या खूनप्रकरणी पाेलिसांनी चाैघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतलं आहे.

पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, कय्यूम मुल्ला, हवालदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, अतुल कुंभार, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सर्जेराव सूळ, अमोल पवार, अवधूत धुमाळ, अभिजित धनवट, फैयाज शेख, केतन लाळगे, अविनाश शिंदे, बापूराव मदने, गोविंद आंधळे, चालक विजय शिंदे, अमोल अडसूळ, शुंभागी धायगुडे, प्रिया नरुटे हे यांचा कारवाईत सहभाग होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT