Mahadev Jankar Saam TV
महाराष्ट्र

Mahadev Jankar : छगन भुजबळ मुखमंत्री झाले तर चांगलंच; महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं

Mahadev Jankar On Chhagan Bhujabal : महादेव जानकरांना महायुतीमधून परभणी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर त्यानी छगन भुजबळांबद्दल अशी भावना व्यक्त केलीये.

Ruchika Jadhav

लक्ष्मण सोळुंके

Political News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री बनलं तर चांगलंच आहे, असं पुन्हा एकदा महादेव जाणकार यांनी म्हटलं आहे. महादेव जानकरांना महायुतीमधून परभणी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर त्यानी छगन भुजबळांबद्दल अशी भावना व्यक्त केलीये.

महादेव जानकरांनी जालना जिल्ह्यातील परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या परतूर आणि मंठा तालुक्यात प्रचार सुरु केलाय. या प्रचारदौऱ्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. बबनराव लोणीकर आणि राजेश विटेकर यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला होता.

मात्र त्यांच्या मागणीनंतर जानकरांना उमेदवारी देण्यात आल्यानं ते नाराज असल्याच बोललं जात होतं. मात्र काल जानकरांनी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर जानकरांच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलीये, असं जानकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मराठा नेते माझ्यासोबत असल्याने मराठा मतांचं ध्रुवीकरण होणार नाही, असं ही यावेळी जानकर यांनी म्हंटलं. दरम्यान भुजबळ साहेब हे आदरनीय नेते आहेत. मोठे नेते असून त्यांनी मुख्यमंत्री झालं तर काय वाईट आहे? असं वक्तव्य देखील जानकरांनी केलंय.

त्यामुळे मराठा समाजाकडून या वक्तव्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हावं असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं. मुख्यमंत्री पदासाठी या आधी देखीस अनेक मोठ्या नेत्यांच्या नावाची चर्चा झाली आहे. अशात जानकरांच्या वक्तव्याने सध्या छगण भुजबळांचं नाव चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT