Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Madha Loksabha Election: शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला नेता आता भाजपकडून माढ्यातून लढणार, स्वतःच जाहीर केली इच्छा

Maharashtra Politics News: पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यास निवडणूक लढवणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Loksabha Election 2024:

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असली तरी, स्वतः पवार यांनी निवडणूक लढणार नाही, असं जाहीर केलंय. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि सध्याचे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर, मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असून दौरे, नवीन नियुक्त्यांकडे भर दिला जात आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांनीही स्वतः माढ्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाले धैर्यशील पाटील?

माढा लोकसभा मतदार (Masha Loksabha Election) संघाच्या रणांगणात भाजप (BJP) नेते धैर्यशील पाटील यांनी उडी घेतली असून थेट निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माढा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. "हा मतदारसंघ भाजपचा असल्याने भाजपच ही जागा लढवणार असल्याचे सांगत पक्षाने आदेश दिल्यास काहीही करायला तयार असल्याचे ते म्हणाले.

माढा मतदारसंघात आजपर्यंत मी अनेक कामे केली आहे. नॅशनल हायवे, पाणी प्रश्न योजना, रेल्वेची कामे अशी विविध विकासकामे सुरू असल्याचे सांगत पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यास निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीकडून शरद पवार लढवणार निवडणूक?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. त्यात माढामधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी निवडणूक लढवल्यास माढा मतदारसंघ ताब्यात येईल, अशी त्यांची भावना होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेत्यानं सोडली साथ; फेसबुक पोस्ट करत सांगितलं कारण

Sadhvi Pragya : मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आलं होतं; मालेगाव खटल्यातून मुक्त झाल्यानंतर कोर्टातच रडल्या साध्वी प्रज्ञासिंह

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी

Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

SCROLL FOR NEXT