Ratnagiri-Sindhudurg Loksabha  Saam Tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच; किरण सामंतांचा समर्थक आक्रमक, भाजकडूनही दबावतंत्र

Loksabha Election 2024 : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकत्यांकडून किरण सामंत भावी खासदार असे स्टेटस लक्ष्यवेधी ठरत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अमोल कलये | रत्नागिरी

Political News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक ठिकाणी जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही भाजप आणि शिंदे गट दावे-प्रतिदावे करत आहेत. सोशल मीडियावर दोन्हीकडून गटाकडून दबावाचं राजकारण सुरु आहे.

भाजपकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावतं यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंय, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळवर अन्याय नको. रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि रायगडमध्ये कमळ फुलणार. दोन दिवसांपूर्वी प्रमोद सावंत दापोली दौऱ्यावर होते. मात्र रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात भाजपने निवडणुक निरीक्षक न दिल्याने हा मतदारसंघ कुणाला सुटणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर दुसरीकडे शिंदे गटाकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावर दावा सांगणारे स्टेटस कार्यकर्त्यांकडून ठेवले जात आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकत्यांकडून किरण सामंत भावी खासदार असे स्टेटस लक्ष्यवेधी ठरत आहेत. (Latest Marathi News)

'ज्यांच्या मागे अडचणी गंभीर, त्यांच्या पाठिशी भैय्याशेठ खंबीर.. आपल्या हक्काचा माणूस.' 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच.' असे स्टेटस किरण सामंत यांच्या समर्थकांनी ठेवले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग येथे सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा शिवसेनेची असल्याची दावा शिंदे गटाकडून केली जात आहे.

नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये पुन्हा नारायण राणे भाजपकडून निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या या चढाओढीत बाजी कोण मारणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT