lok sabha Election 2024  Saam tv
महाराष्ट्र

lok sabha Election 2024 : राज्यात प्रचारसभांचा धडाका; आज कोण कुठे सभा घेणार?

Vishal Gangurde

मुंबई : आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. चौथ्या टप्प्यात आज ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यामुळे आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आज मोठ्या प्रमाणात सभा आणि रॅलीचे आयोजन केलं आहे.

चौथ्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थांबता येणार नाही. मतदानापूर्वी दोन दिवस सर्वच उमेदवार आणि मतदारांसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनाच आता याची उत्सुकता लागली आहे.

राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी बैठक, रॅली आणि सभांचा धडाका

पालघर – महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघर येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता ही बैठक आयोजित केली आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता या रोड शोला सुरुवात होणार आहे.

पुणे - शरद पवार, आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे यांची हडपसर येथे सभा सकाळी 9 वाजता होणार आहे.

पुणे - सुप्रिया सुळे यांची कोथरूड येथे रॅली सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे.

पुणे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी 10.30 वाजता सभा घेणार आहेत.

नाशिक – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत नाशिकमध्ये सभा घेणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर - नवनीत राणा या आज दुपारी 2 वाजता महिला मेळावा घेणार आहेत.

अहमदनगर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी 3.30 वाजता श्रीगोंद्यात सभा घेणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर - अभिनेता गोविंदा हे शहरात रॅली काढणार आहेत.

बीड - पंकजा मुंडे यांची परळीत सभा आहे. दुपारी १२ वाजता ही सभा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT