Dhule Nandurbar Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dhule Nandurbar Lok Sabha : धुळ्यातून भामरेंनी घेतली आघाडी, नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवरच

Dhule Nandurbar News : लोकसभा निवडकुणीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Rajesh Sonwane

भूषण अहिरे/सागर निकवाडे 
धुळे/ नंदुरबार
: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून काही ठिकाणी अनपेक्षित चित्र पाहण्यास मिळत आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातून तिसऱ्या फेरीपर्यंत पिछाडीवर असलेले सुभाष भामरे यांनी आता आघाडी घेतली आहे. तर नंदुरबारमधून भाजपच्या हिना गावित या पाचव्या फेरीअखेर पिछाडीवरच आहेत. 

लोकसभा निवडकुणीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. असेच चित्र धुळे लोकसभा मतदार संघात तिसऱ्या फेरीपर्यंत पाहण्यास मिळत होते. तिसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी आघाडी घेतलेली होत भामरेंना मागे टाकले होते. मात्र चौथ्या फेरीचे आकडे आल्यानंतर यात सुभाष भामरे यांनी ५६०० मतांनी लीड घेतली आहे. चौथ्या फेरी अखेर काँग्रेसला एक लाख पस्तीस हजार मतदान तर भाजपला एक लाख ४० हजार ९०० मतदान मिळाले आहे. 

हिना गावित पिछाडीवरच 

नंदुरबार लोकसभा मतदार संघात पाचव्या फेरी अंती काँग्रेसचे उमेदवार अँड गोवाल पाडवी हे ८० हजार मतांनी आघाडीवर आहेत.  तर भाजपाच्या डॉ. हिना गावित या पहिल्या फेरीपासून पिघाडीवर आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT