अहमदनगर : राज्यात तिसऱ्या लाटेची भीती आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. काही केल्या रूग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. नगरमधूनच तिसरी लाट येते की काय अशी भीती सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे. पहिल्या लाटेत संगमनेर, राहाता, कोपरगाव, आणि पारनेर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण होते. दुसऱ्या लाटेतही याच तालुक्यांनी रूग्ण वाढवले. आता पारनेरमध्ये उच्छाद सुरू आहे.
आठवडे बाजार कोरोना प्रसाराचे केंद्र ठरत आहेत. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बाजारांवर बंधने घातली असली तरी खरेदीसाठी लोक गर्दी करीत आहेत. त्याचमुळे कोरोनाचा आकडा वाढत आहे.Lockdown in 12 villages in Parner abn79
तालुक्यातील कान्हूर पठारसह निघोज, भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या १२ गावांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या शिवाय तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात यावेत, असाही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. पारनेर तालुक्यातील वाढत्या कोरोना स्थितीचा काल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपसंचालक पुना गांडाळ यांनी तालुक्यात भेट देऊन आढावा घेतला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. Lockdown in 12 villages in Parner abn79
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेश अढारी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे उपस्थित होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.