Pandharpur: भीमा नदी पात्रातील वाळू लिलावास स्थानिकांचा विरोध
Pandharpur: भीमा नदी पात्रातील वाळू लिलावास स्थानिकांचा विरोध भारत नागणे
महाराष्ट्र

Pandharpur: भीमा नदी पात्रातील वाळू लिलावास स्थानिकांचा विरोध

भारत नागणे

पंढरपूर: तीन वर्षानंतर सोलापूर (Solapur) महसूल प्रशासनाने भीमा नदी (Bhima River) पात्रातील वाळू उपसा लिलाव मंजूर केले आहेत. दरम्यान हे लिलाव ३ वर्षासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे नदी (River) पात्रातून मर्यादेपेक्षा अधिक वाळू (Sand) उपसा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होण्याची भिती वर्तवली जात आहे.

हे देखील पहा-

वाळू उपसा लिलावास मंगळवेढा (Mangalwedha ) तालुक्यातील भीमा नदी काठच्या अर्धनारी व बठाण या दोन्ही गावातील (village) स्थानिक शेतकरी (Farmers) आणि ग्रामस्थांनी विरोध केला आहे. अनेक वर्षानंतर मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील चार ठिकाणी जिल्हाधिकार्यांनी (Collector) आॅनलाईन पध्दतीने वाळू लिलाव जाहीर केले आहेत. हे वाळू लिलाव संशयाच्या भोवर्यात अडकले आहेत.

याच ठिकाणाजवळ मोठ्या प्रमाणावर वन जमिनी आहेत. यामध्ये जंगली झाडे आहेत. यात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असताना नैसर्गिक साधनांना हानी पोहचवत या जंगल क्षेत्रात मोठी हानी होणार आहे. मर्यादेपेक्षा अधिक वाळू उपसा होणार असल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT