ओबीसी आरक्षण देऊनच होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका; नाना पटोलेंचा दावा Saam Tv News
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण देऊनच होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका; नाना पटोलेंचा दावा

इम्पिरिकल डेटा तयार करून ओबीसी आरक्षण देऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचा दावा कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: 450 कोटी रूपये खर्च करून ओबीसी जनगणना होणार असल्याचे वक्तव्य कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर असल्याने मागासवर्गीय आयोगाच्या मागणीनुसार ओबीसी जनगणनेसाठी 450 कोटी रुपये देण्यास महाविकास आघाडीचे सरकार तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज ते आपल्या भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान गृह तालुका साकोली आल्यावर बोलत होते. (Local body elections will be held only with OBC reservation; Nana Patole's claim)

हे देखील पहा -

यावेळी इम्पिरिकल डेटा तयार करून ओबीसी आरक्षण देऊनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकार ओबीसी जनगणनेस विरोध करत असल्याच्या आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. ''भाजपाच्या लोकांना संविधान माहित नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अभ्यास कमी आहे'' अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेले तसेच 50 वर्षांपासुन राहणाऱ्या लोकांना आरक्षणाबाबत कांग्रेस आग्रही असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आरक्षण देऊन महाविकास आघाडी ओबीसींच्या जागेवर डल्ला मारीत असल्याच्या आरोपावर नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. कांग्रेस संपूर्ण उत्तर प्रदेशातील लोकांना आरक्षण देण्याबाबत बोलत नसून जे उत्तर भारतीय महाराष्ट्रात जन्मलेले असून 50 वर्षांपासुन महाराष्ट्रात राहतायत, त्या लोकांना आरक्षण लागू करण्याबाबत कांग्रेस आग्रही असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT