मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी दीड लाखांची रोकड जप्त
निलेश राणे यांनी थेट निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय.
या प्रकरणामुळे स्थानिक निवडणूक वातावरणात तणाव निर्माण झालाय.
राज्यातील अनेक ठिकाणी आज नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी वादावादी आणि राडा झाला. तर मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा खळबळजनक प्रकार घडला. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतलाय.
राणे यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. तर निलेश राणे यांनी थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली. याप्रकरणी निलेश राणे यांनी आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतलाय. निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मी चार दिवसांपूर्वी पैशांचा प्रकार पकडून दिला. त्याचा अहवाल अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेला नाहीये. त्यांनी तो पुढे पाठवलेला आहे. ते पब्लिक डॉक्युमेंट आहे, त्यात ते सर्वांना दिसायला हवं. कालच्या विषयात अजूनपर्यंत एफआयआर दाखल नाही. मागच्या विषयात देखील एफआयआर दाखल नाहीये, उलट माझ्यावरच एफआयआर दाखल झाल्याचं निलेश राणे म्हणालेत.
कारमध्ये पैसे सापडल्याच्या प्रकरणी मी सकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो. त्याच्यावर एफआयआर झाली नाहीये. जे सर्व आरोपी पकडले गेलेत. ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सर्व सुटलले आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाहीये. हे मला माहिती होतं हे असेच होणार आहे. पण आता मी वकिलांशी बोलून या विषयात ज्या ज्या कोणत्या पार्टी आहेत, यात ज्यांचा हातभार असेल अशा सगळ्यांवर मी केस करणार, निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, असा निर्णय निलेश राणे यांनी घेतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.