Maharashtra Local Body Election Saam Tv
महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; ४ ठिकाणची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली, कारण काय?

Municipal Polls in Four Ahilyanagar Cities Deferred: कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार. राज्यातील २४६ नगरपालिका तसेच ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, अहिल्यानगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळंच चित्र समोर आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्याची माहिती आहे. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या ४ ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या अपीलांमुळे संबंधित नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

तसेच सात नगरसेवक पदांच्या उमेदवारांविरोधातही न्यायालयीन अपील प्रलंबित असल्यानं त्या जागांसाठीची मतदान प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकललेल्या नगरपरिषद तसेच नगरसेवक पदांच्या निवडणूक प्रक्रियेत माघार अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

स्थगित केलेल्या नगरपरिषद निवडणुकांचे मतदान २० डिसेंबर रोजी होणार असून, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात १२ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण ८६ उमेदवार, तर २८१ नगरसेवक पदांसाठी १,९३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर नगरपालिक सर्वाधिक आघाडीवर असून, या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी १३ उमेदवार, तर नगरसेवक पदांसाठी तब्बल २०८ उमेदवार स्पर्धेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : लातूरच्या उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी

Attraction Sign: समोरची व्यक्ती तुम्हाला आकर्षित करतेय, हे कसं ओळखायचं?

Samosa Roll Recipe : 2 मिनिटांत बनतील 16 समोसा रोल, फक्त लाटा 1 चपाती अन् फॉलो करा 'ही' ट्रिक

बार्शीत ठाकरे गटाला मोठे यश, भाजपनेही चार जागांवर मारली बाजी|VIDEO

Nagar palika election result LIVE : नाशिकमध्ये मोठा उलटफेर, अजित पवारांनी २५ वर्षांची सत्ता उलथवली, शिंदेंना जोरदार धक्का

SCROLL FOR NEXT