"Political tensions rise in Mahad after clashes; Sunil Tatkare counters allegations by Bharat Gogawale." 
महाराष्ट्र

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

Tatkare Vs Gogawale : महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारीमुळे राजकीय वादळ निर्माण झालंय. मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांना सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सखोल पोलीस चौकशीची मागणी केली आहे.

Bharat Jadhav

  • महाड नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान मोठा राडा झाला.

  • सुनिल तटकरेंनी आरोप फेटाळून लावले

  • राड्यानंतर महाडमध्ये राजकीय संघर्ष अधिक चिघळलाय.

स्वतः कृत्य करायचे आणि दुसऱ्यावर आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्य भर केलाय. आपला या प्रकरणाशी दुरान्वये संबध नाही. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी, मागणी करत खासदार सुनिल तटकरेंनी भरत गोगावलेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिलंय.

रायगडातील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान तुफान हाणामारी झाली. या राड्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापलंय. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यानंतर तटकरेंनी गोगावलेंना उत्तर दिलं. महाडच्या राड्या प्रकरणी सुनिल तटकरेंनी सावध भूमिका घेतलीय. आपला या प्रकरणाशी दुरान्वये संबध नाहीये. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुनिल तटकरेंनी केली आहे.

चौकशीची मागणी करताना राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरेंनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यांच आयुष्य गुन्हेगारीने बरबटले आहे, त्यांनी अस बोलू नये, असं म्हणत तटकरेंनी गोगावलेंचे नाव घेता त्यांच्यावर टीका केलीय. स्वतः कृत्य करायच आणि दुसऱ्यावर आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्य भर केलाय अशा शब्दात तटकरेंनी गोगावले यांच्यावर टीका केली आहे.

गोगावलेंचा आरोप काय?

“विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचतायेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यारे घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. त्यांना जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल, असं भरतशेठ गोगावले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT