Eknath Shinde  Saam TV
महाराष्ट्र

Live Updates : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला विकलं: एकनाथ शिंदे

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

स्वतःमध्ये सुधारणा करा, आत्मचिंतन करा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वतःमध्ये सुधारणा करा, आत्मचिंतन करा, असा सल्ला शिंदेंनी ठाकरेंना दिला आहे.

गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे शिवतीर्थावर पोहोचले

हा लोकशाहीचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर बोलताना दिली.

नामर्दांनो तुम्हाला चोरी पचणार नाही - उद्धव ठाकरे

नामर्दांनो तुम्हाला ही चोरी पचणार नाही. निवडणूक आयोगाने मागील काही दिवस थोतांड केलं. निवडणूक आयोगाने शेण खाल्ल.

रावणाकडेही धनुष्यबाण होता आणि रामाकडेही धनुष्यबाण होता-  उद्धव ठाकरे

रावणाकडेही धनुष्यबाण होता आणि रामाकडेही धनुष्यबाण होता. विजय रामाचाच झाला. विजय सत्याचाचा होतो

येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते- उद्धव ठाकरे

येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते. मुंबई महापालिका काहीही करुन त्यांना जिंकायची आहे. मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दारात उभे करायचं आहे. स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरु आहे.

देशातील लोकशाही संपलेली आहे - उद्धव ठाकरे

देशातील लोकशाही संपलेली आहे, आजचा निकाल अनपेक्षित आहे - उद्धव ठाकरे

सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं- श्रीकांत शिंदे

सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं.... हा आमचा नव्हे, बाळासाहेबांचे विचार, संस्कार, लोकशाही आणि सत्याचा विजय आहे! शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं ट्विट

शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे काढू शकत नाही- बाळासाहेब थोरात

शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे काढू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे

राजकीय वर्तुळातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

SCROLL FOR NEXT