Sharad Pawar Action Plan Ready Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates: आशिवार्द घेतले, बाकी काही नाही, नो कमेंट्स; शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

Maharashtra Monsoon Session Live: राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Chandrakant Jagtap

आशिवार्द घेतले, बाकी काही नाही, नो कमेंट्स; अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदरांनी शरद पवारांची वायबी सेंटर येथे जाऊन भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलणं आमदारांनी टाळलं आहे. अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आम्ही पवारांचे आशिर्वाद घेतले, बाकी काही नाही, नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काल काही आमदारांना भेटता आलं नाही, म्हणून आज भेटलो - प्रफुल्ल पटेल

शरद पवारांची भेट घेतल्यानतंर प्रफूल पटेल म्हणाल "काल रविवार असल्यामुळे अनेक आमदार गैरहजर होते. त्यामुळे अनेकांनी शरद पवार यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळेच पुन्हा शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगितले. आज विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे बर्‍यापैकी आमदार मुंबईला हजर होते. त्यामुळे या सगळ्यांनीही शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ते म्हणाले. काल बोलल्याप्रमाणे आम्ही पक्ष संघटना मजबूत एकसंध राखण्यासाठी त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशी विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत.. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला

आत्ताची सर्वात मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. वायबी चव्हाण सेंटर येथे सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. कालच अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आम्ही पवार साहेबांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, असे या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते.

'मविआ'च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मविआच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट,

नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्याची केली मागणी

नीलम गोऱ्हेंविरोधात मविआ आक्रमक

राज्यपालांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला - आंबादास दानवे

नीलम गोऱ्हेंना पदावर बसण्याचा अधिकार नाही - दानवे

अधिवेशनात पूर्ण वेळ हजेरी लावा, विधानसभा अध्यक्षांचे सर्व मंत्र्यांना निर्देश

विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील बैठक संपली आहे. या बैठकीत अधिवेशनात मंत्र्यांनी पूर्ण वेळ हजेरी लावावी, सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावीत, आपापल्या विभागाचे अचूक सादरीकरण करावे, अधिवेशनात गोंधळ होऊ देऊ नका असे निर्देश विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापती यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत.

मविआचे शिष्टमंडळ दुपारी १.३० वाजता राज्यपालांना भेटणार

मविआचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत विरोधक राज्यपालांची भेट घेणार आहेत.

भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचं काम करतंय - नाना पटोले

महाराष्ट्राच्या संस्कृतीला ककलंक लावण्याचा काम भाजप करत आहे. डान्स बार सुरु केले, आता कसिनो सुरु केले. तरूणांना रोगगार द्यायचे नाहीत आणि त्यांच्याकडुन पैसे लाटायचे, हे पाप सरकार करत आहे. याला आमचा विरोध राहणार आहे असे नाना पटोले म्हणाले.

अध्यक्षांच्या दालनात बैठकीला सुरूवात

बैठकीमध्ये प्रामुख्यानं अधिवेशन काळात मंत्र्यांकडून देण्यात येणारी आश्वासनं आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांच्या समन्वयाची ही बैठक आहे. बैठकीला सचिव दर्जाचे अधिकारी, सर्व मंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत.

अंबादास दानवेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही - दरेकर

अंबादास दानवे यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याचं जास्त संख्याबळ त्यांचा विरोधीपक्ष नेता असतो. दानवेंकडे जास्त संख्याबाळ नाही. अंबादास दानवे यांनी नैतिकतेला धरून पहिला राजीनामा द्यावा, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

निलम गोऱ्हेंना पदावर राहता येणार नाही - अंबादास दानवे

निलमताई गोर्हे यांना निलंबित करण्यासंदर्भात आम्ही नोटीस पाठवली आहे. ज्या व्यक्तीवर डिस्क्वालिफिकेशन संदर्भात नोटीस असेल, त्यांना त्या पदावर राहता येत नाही, असे आंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

निलम गोऱ्हेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही - अनिल परब

निलमताई गोर्हे यांनी पक्षाचं सदस्य सोडलं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला माहिती आहे. अध्यक्षांना अधिकार दिलेत. परंतु इथे उपसभापती यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहू नये. त्यांना नैतिक अधिकार नाहीच, पण ते कायदेशीर देखील नाही असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले.

जयंत पाटील यांची राष्ट्रवादी पक्ष कार्यालात बैठक सुरू

बैठकिला विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार उपस्थित

जयंत पाटील

अनिल देशमुख

जितेंद्र आव्हाड

रोहित पवार

सुमनताई पाटील

एकनाथ खडसे

राजेश टोपे

बाळासाहेब पाटील

अशोक पवार

सुनिल भुसारा

मानसिंग नाईक

प्राजक्त तणपुरे

चंद्रकांत नवघरे

गोऱ्हे यांना अपात्रतेच्या नोटीसीवर पुढील १४ दिवसात उत्तर द्यावे लागणार

विधान परीषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोर्हे आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोर्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील १४ दिवसात उत्तर द्यायचे आहे.

राष्ट्रवादीच्या २८ आमदारांची विधानसभेला दांडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकूण आमदार ५३ आहेत. यातील नवाब मलिक तुरुंगात असल्यामुळे सध्या ५२ आमदार उपलब्ध आहेत. त्यापैकी अजित पवार गटाचे १५ उपस्थित होते, तर शरद पवार गटाचे ९ आमदार सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एकूण २८ आमदार अनुपस्थित राहिले.

विधानसभेनंतर विधान परिषदेतही विरोधकांचा सभात्याग

विधानसभेनंतर विधान परिषदेतही गदारोळ

ठाकरे गटाची निलम गोऱ्हेंसह तीन आमदारांवर अपात्रतेची कारवाई

सभागृहात विरोधकांचा सभापती निलम गोऱ्हेंवर आक्षेप

विधानसभेनंतर विधान परिषदेतही विरोधकांचा सभात्याग

विरोधकांकडून सभापतीच्या विरोधात घोषणाबाजी

नियमांची पायमल्ली करणार्या सभापतींचा धिक्कार असोच्या घोषणा

ठाकरे गटाची निलम गोऱ्हेंसह 3 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई

निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपत्रतेची नोटीस बजावली आहे. विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे. या तीनही विधानपरिषदेच्या आमदारांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे अनेक आमदार सभागृहात गैरहजर

राष्ट्रवादी अनेक आमदारांनी अधिवेशन पहिल्या दिवशी सभागृहात कामकाज कडे पाठ फिरवली. कोणत्या गटात कोण आहे? हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभेच्या कामकाजात भाग घेणे टाळले.

विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानसभेच्या पहिल्यात दिवशी सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, हे सरकार खातेवाटपात आणि दिल्लीवारीत व्यस्त असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष आहे, कुठल्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे उत्तर दिले. दरम्यान विरोधकांकडून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग करण्यात आला. यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विरोधकांचा सभात्याग

शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. शेतकरी आवाज दांबनाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सभागृहात काँग्रेसकडून कऱण्यात आली. शेतकऱी प्रश्नावर घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

कुठल्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - देवेंद्र फडणवीस

पेरण्या कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज आहे. राज्यात पेरण्या कमी झाल्या तर त्यासाठी सरकारकडून प्लान तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.

बोगस बियानांवर कारवाई होईल. या संदर्भात कायदा अधिक कठोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक व्यवस्था आपण सुरू केली आहे, ज्यानुसार बियाने, खते यात बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या संदर्भात संबंधितांना अपात्र करून त्यांच्यावर कायदेशीर करावाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

राज्यातील शेतकरी हवालदिल, सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही - थोरात

आज 17 जुलै आहे. आजची स्थिती अशी आहे की, राज्यातील बहुतांश भागात पाऊस नाही. पेरण्या केवळ 20 टक्के झाल्या आहेत. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. राज्यात हप्तेगिरी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शरद पवार गटाकडून आमदारांसाठी व्हीप जारी

शरद पवार गटाकडून आमदारांना विरोधी बाकावर बसण्यासाठी व्हीप जारी जितेंद्र आव्हाड यानी जारी केला व्हीप

विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी 

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षाने विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आधी होते खोके सरकार, आता झाले बोके सरकार, अशा आशयाच्या घोषणाबाजी विरोधीपक्षांतील आमदारांकडून करण्यात आली. 

Monsoon Session Live Upadates

आमच्यात कोणतीही अस्वस्थता नाही- संजय गायकवाड

विरोधक काय टीका करतात त्याची आम्ही परवा करत नाही. आता आमचे सरकार मजबूत झालेले आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली, त्यामुळे आमच्यात कोणतीही अस्वस्थता नाही. जागावाटपाला बराच वेळ आहे. जागावाटप आम्ही समान करू. शेतकऱ्यांचा आम्ही नक्कीच विचार करू. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नवीन कृषिमंत्री असले तरी सभागृह या संदर्भात योग्य निर्णय घेईल असे संजय गायकवाड म्हणाले.

अजित पवार गट आमदारांना व्हीप बजावण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या नव्या पक्ष कार्यालयात अजित पवार गटाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील याच्यासह अनेक आमदार उपस्थित आहेत. अधिवेशनातील कामकाज आणि रणनिती यावर बैठकीत चर्चा होणार आहे. पक्ष कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत व्हीप जारी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विधानसभेतील बैठक व्यवस्था शिवसेनेप्रमाणे

शिवसेना फुटल्यानंतर मंत्री हे सत्ताधारी बाकावर तर उर्वरित आमदार हे विरोधी बाकावर होते. तशीच व्यवस्था राष्ट्रवादी देखील आज असणार आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हा निर्णय अजून झालेला नाही. अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार सत्ताधारी बाकांवर बसतील तर काही आमदार विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत बसण्याची व्यवस्था आहे.

आज विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होईल - थोरात

अधिवेशन आज सुरू होतेय. काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून बसणार आहे. आसन व्यवस्था पण तशीच आहे. प्रश्न फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा आहे, त्याबाबत चर्चा करून दिल्लीतून मार्गदर्शन घेतलं आहे. अद्याप नावाबद्दल निर्णय झालेला नाही. आज निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही 45 सदस्य आहोत. दिल्ली चांगलं मार्गदर्शन करेल असे बाळासाहेब थोरात म्हणाले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाबाबत अद्याप विचार केलेला नाही अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रसेची बैठक

काँग्रेस विधिमंडल पक्षाची 9.30 वाजता महत्त्वाची बैठक. विरोधी पक्षनेते पदासाठी उमेदवार निश्चित करणार. कोण होणार विरोधीपक्षनेता याच बैठकीत ठरणार आहे.

चहापणाच्या वेळी कोणाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं - विजय वडेट्टीवार

काल बोलताना सत्ताधारी विरोधक गोंधळलेले आहेत अशी भूमिका मांडली, परंतु सत्ताधाऱ्यांची अपना अपना वाटा कैसा मिलेगा अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची दिसली. कालच्या चहापणाच्या वेळी कोणाच्याच चेहऱ्यावर हसू नव्हतं. सरकारची साठमारी आणि लुटमारी सुरू आहे. विरोधकांना संख्येने कमी समजू नका, आम्ही जोरदार बाजू मांडू असे वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी इतर मंत्र्यांवर सोपवला काही खात्यांचा भार

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार शिंदे गटातील इतर मंत्र्यावर सोपवला आहे. अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभा आणि विधानपरिषदेत या खात्याच्या येणाऱ्या संबंधित प्रश्नावर हे मंत्री उत्तर देतील. मंत्री मंडळ विस्तार आणि खाते वाटप झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जी खाती होती त्याचा तात्पुरता भार संबंधित मंत्र्यांवर दिला आहे. यामध्ये...

गुलाबराव पाटील - सामान्य प्रशासन विभाग

शंभूराजे देसाई - सामाजिक न्याय व दिव्यांग

दीपक केसरकर - पर्यावरण

उदय सामंत - नगर विकास माहिती आणि तंत्रज्ञान

अब्दुल सत्तार - खनिकर्म

दादा भुसे - परिवहन

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नावांची चर्चा

विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेते विजय वड्डेतिवर, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची नाव चर्चेत आहेत. आधी या पदासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची नाव चर्चेत होती, परंतु आता दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे विधानभवनातील शेडचा काही भाग पडला

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा फटका विधानभवन परिसरात तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या शेडला बसला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने शेडवरील काहीसा भाग पडला होता. त्यानंतर पुन्हा शेड बांधण्यात आलेलं आहे.

अजित पवार मंत्रालयातील दालनात

अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. त्याअगोदर वित्त विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अजित पवार मंत्रालयातील दालनात पोहचले आहेत.

विधिमंडळ राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप बदल नाही.

अजितदादा गट आणि शरद पवार गट याना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाही. पक्ष कार्यालय पहिलेच असून त्यात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्या नावाची पाटी आहे.

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

Maharashtra Monsoon Session Live: राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनिती आखली आहे, तर सत्ताधारीही विरोधकांचे डाव उलटवून टाकण्यासाठी सज्ज आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT