Maharashtra Monsoon Session: पहिल्याच दिवशी ठाकरे गट आक्रमक; निलम गोऱ्हेंसह पक्षांतर केलेल्या 3 आमदारांवर अपात्रतेची कारवाई

Maharashtra Poitical News: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने निलम गोऱ्हे , मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं आहे.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionSaam tv

निवृत्ती बाबर

Mumbai News: राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पहिलं अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने निलम गोऱ्हे , मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं आहे. (Latest Marathi News)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे,बिपल्व बजोरिया यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या तिघांवर कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने विधीमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे नोटीस बजावली आहे. या तिन्ही विधानपरिषदेच्या आमदारांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Maharashtra Monsoon Session
Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार का?, संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण...

दरम्यान, विधान परीषदेतील ठाकरे गटाचे आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधीमंडळ सचिवांना पत्र देण्यात आले आहे. या पत्राला आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील १४ दिवसात उत्तर द्यायचे आहे.

अनिल परब यांनी यावर भाष्य करताना म्हणाले, 'निलम गोऱ्हे यांनी पक्षाचं सदस्य सोडलं आहे.आम्ही त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विधान भवन सचिवांकडे नोटीस पाठविली आहे. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला माहिती आहे, अध्यक्षांना अधिकार दिले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी उपसभापती यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी. तसेच नीलम गोऱ्हे यांनी त्या पदावर राहू नये. त्यांना नैतिक अधिकार नाहीच आहे, त्याचबरोबर कायदेशीर अधिकारी देखील नाही, असेही अनिल परब म्हणाले.

Maharashtra Monsoon Session
Shivsena MLA Disqualification: १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय लवकरच? ३१ तारखेला सुप्रीम कोर्टात काय होणार?

मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार

मविआचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत विरोधक राज्यपालांची भेट घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com