Auranagbad Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News: गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू, औरंगाबादेतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (Aurangabad)

श्रेया असं मृत लहानगीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया जेवन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेली. मात्र तेथे पाय घसरुन ती खाली पडली. त्याठिकाणी बादलीत हीटरच्या साह्याने पाणी केलं होतं. हीटरने गरम झालेल्या पाणी अंगावर पडल्याने श्रेया भाजली. वाळूज परिसरातील साईनगर कमळापूर येथे ही घटना घडली. (Latest Marathi News)

दुर्गटनेदरम्यान श्रेयाचे आई-वडील भाऊ सर्व कुटुंब घरातच होतं. कुटुंबियांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले होतं. गंभीर भाजलेल्या श्रेयावर उपचार सुरू असताना तिचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT