विनयभंग करत, दारू विक्रेत्याची महिलेला भर रस्त्यात मारहाण ! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Crime : विनयभंग करत, दारू विक्रेत्याची महिलेला भर रस्त्यात मारहाण !

पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका, नागपुरातील प्रकार !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : अवैध दारू विक्रीत गुंतलेल्या एका आरोपीने एका महिलेला भर रस्त्यावर मारहाण केली व तिचे कपडे देखील ओढल्याचा संतापजनक प्रकार नागपुरात घडला आहे. या संपूर्ण प्रकरणात पाचपावली पोलिसांनी मात्र, आरोपीला मदत करण्याची भूमिका वठवली, त्यामुळे हे संतापजनक प्रकरण सोमवारी सर्वत्र चर्चेला आले आहे.

गुड्डू सिंग उर्फ गुरु ध्यानसिंग लोहिया (वय 34) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो वैशालीनगर मध्ये राहतो. गुड्डू त्याच्या पत्नीचा प्रचंड छळ करीत असल्याचे कळल्याने गुड्डूची नातेवाईक असलेली महिला वय (37 ) रविवारी सायंकाळी 05:45 वाजता त्याच्या घरी समजूत घालण्यासाठी गेली. गुन्हेगारी वृत्तीच्या गुड्डू ने तिच्यासमोरच पत्नीला खेचत बाहेर आणले त्यामुळे पीडित महिलेने स्वतः च्या मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून आरोपी गुड्डू पीडित महिलेच्या अंगावर धावला त्याने तिला खाली पाडून मारहाण केली.

हे देखील पहा -

अनेक लोकांसमोर हा प्रकार घडला, कशीबशी सोडवणूक करून घेत पीडित महिला पाचपावली पोलिस ठाण्यात पोहचली. मात्र, पोलिसांशी मधूर संबंध ठेवून असलेला गुड्डू त्याच्या साथीदारांसह आधीच पाचपावली पोलिस ठाण्यात पोहोचला होता. तेथे त्याला पोलिसांनी आत मध्ये बसवले आणि पीडित महिलेला बाहेरच ठेवले तिची तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही माहिती गेली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर तब्बल दिड दोन तासानंतर पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार अनिच्छेने नोंदविणे सुरु केले.

ती सांगत असलेली माहिती सोडून पोलीस तिला मध्येच घडल्या प्रकारचा काय पुरावा आहे असे विचारत होते. सदर महिलेवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत होते, मात्र, तिने आपली तक्रार रेटून धरल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंग करून मारहाण केल्याची धमकी दिल्याचे कलम ( 354,294, 506, 323) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

आरोपी गुड्डू हा अवैध दारू विक्री करतो. पाचपावली ठाण्यातील अनेक पोलिसांसोबत त्याचे मधुर संबंध आहेत. त्यामुळे पती-पत्नीचा वाद संबोधत पोलीस आधी त्याच्याविरुद्ध गुन्हाच दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. नंतर मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झापल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु साधी कलमे लावून त्याला कोर्टातून सहज जामीन मिळाला अशी सोय करून ठेवली. त्यानुसार आरोपी गुडूला आज जामीन देखील मिळाला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

SCROLL FOR NEXT