liquor
liquor 
महाराष्ट्र

देशीस २, विदेशीसाठी ५ रुपयांत मद्य परवाना घ्या; कारवाई टाळा

संदीप नागरे

हिंगाेली (hingoli) : या पुढे मद्यपींना त्यांच्या आवडीचे कोणतेही मद्य (liquor) खरेदी करायचे असल्यास त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (maharashtra state excise department) वतीने देण्यात येणारा मद्य प्राशन परवाना (permit) दारू खरेदी करताना दारू विक्रेत्यांना दाखवावा लागणार आहे. या परवान्या शिवाय मद्य न देण्याचे आदेश राज्य (maharashtra) उत्पादन शुल्क विभागाने हिंगाेली जिल्ह्यातील सर्व दारू विक्रेत्यांना दिले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनूसार देशी दारूसाठी दाेन रुपयांमध्ये तसेच इतर वाईनसाठी पाच रुपयांमध्ये इच्छुकांना मद्य बाळगणे, सेवन करणे आदींचा परवाना मिळू शकणार आहे. हा परवाना मद्याच्या दुकानातून देखील उपलब्ध करून दिला जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने परवाने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यास प्रारंभ झाला आहे. आगामी महिनाभरात सात हजार परवाने मद्य प्रेमींना देण्याचे उद्दिष्ट डाेळ्या समाेर ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत राहिले आहे. मद्यप्रेमींना परवाना नसल्यास त्यांच्यावर हाेणार कारवाई टळावी यासाठी परवाना घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Mahadik | धनंजय महाडिक यांची कुणावर टीका?

Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये का पाठवले? आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंच्या टीकेवर हल्लाबाेल, Video

KL Rahul Record: केएल राहुलला नंबर १ बनण्याची संधी! अवघ्या ३५ धावा करताच रचणार इतिहास

Buldana News | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

Narayan Rane: उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून पळून गेले होते, मीच परत आणलं; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT