lightning cause 20 sheep dies in balapur near akola saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain In Akola : वीज कोसळली अन् सगळं संपलं; टाकळीत 20 मेंढ्यांचा मृत्यू

शासनाने आम्हांला मदत करावी अशी मागणी मेंढपाळाने सरकारकडे केली आहे.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Unseasonal Rain Hits Akola :

अकाेला जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाळापूर तालक्यातील टाकळी खोजबळ येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे 20 मेढऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे. याबराेबरच पाच बक-या गंभीर जखमी झाल्याचे मेंढपाळाने साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. (Maharashtra News)

अकोला जिल्ह्यात मध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. बाळापुर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील मेंढपाळ शालिकराम बिचकुले हे आपल्या मेंढऱ्यांसह टाकळी येथे आले हाेते.

टाकळी येथील शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतामध्ये त्यांची मेंढर चरत हाेती. दरम्यान रात्रीच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे बिचकुले यांच्या 20 बकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेत पाच बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनंतर शेतकरी कुटुंब हादरुन गेले. शासनाने आम्हांला मदत करावी अशी मागणी शालिकराम बिचकुले (मेंढपाळ, लाखनवाडा जिल्हा बुलढाणा) यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT