Aurangabad Devendra Fadnavis Benar Saam Tv
महाराष्ट्र

'हे माऊली तुझा आर्शिवाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे'

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अशा स्वरुपाचे बॅनर राज्यातील शहरांमध्ये लागले आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Shivsena) धोक्यात आलं असून सरकार लवकरच पडेल अशा चर्चा सुरू आहे. अशातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील. अशा स्वरुपाचे बॅनर राज्यातील शहरांमध्ये लागले आहे. औरंगाबादेतील क्रांतीचौकात सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ दे अशा स्वरुपाचे बॅनर लागले आहे. (BJP Latest Marathi News)

'हे माऊली तुझा आर्शिवाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे' अशा स्वरुपाचे बॅनर शहरात लागले आहे. यावर कुणाल नितीन मराठे भारतीय जनता पार्टी असे लिहिण्यात आले आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात राजकीय भुकंप होत आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अनेक आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे आहेत. अशातच राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. (Eknath Shinde Latest News)

दुसरीकडे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याला तीन दिवस उलटून गेले असली तरी देखील आपण शिवसेनेसोबत असून शिवसेना सोडणार नसल्याचं शिंदेंकडून सांगण्यात येत आहे. मात्र शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत गद्दारी केल्याचा सुर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या बोलण्यातून समोर येत होता. त्यामुळे आता शिंदे नक्की काय भूमिका घेणार याकडे राज्यभरातील शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT