vegetables prices News Saam Tv
महाराष्ट्र

vegetables prices News: पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण

Vegetable Price: वाढत चाललेल्या महागाईमुळे आता भाज्यांनाही महागाईची फोडणी बसली आहे. वाढत्या उन्हाळामुळे आणि अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या किमतीत दोन-तीन पटीने वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसेंदिवस उणाचा चटका वाढत असून या उकाड्याने नागरिक देखील हैराण आहेत. अशातच उन्हाळा संपत आला असून पावसाळ्याला सुरुवात होत आहे. मात्र सध्या मे आणि जून महिन्यातील कडक उन्हाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या पिकावर झाला आहे. काही दिवसात भाजीपाल्याचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच जाणार आहे.

जून महिन्याला सुरुवात झाली आहे तरी नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. यंदा नागरिकांना उष्णेतस भीषण पाणीटंचाईचाही समस्याला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम भाजीपाल्यांना बसलाय. शेतात यंदा कडक उन्हामुळे भाज्यांचे (vegetables)उत्पादन घटले त्यामुळे बाजारातही भाज्यांची आवक कमी असल्याने त्यांची मागणी वाढली आणि त्यामुळं भाजीपाल्यांचे दर देखील कडाडले.

भाजीपाल्यांचे दर हे सध्या वाढले असून सर्वच भाज्या सरासरी ८०ते १०० रुपये किलो दराने विकत असून ग्राहकांच्या (Customers)खिशाला कात्री बसत असल्याने त्यांनी सुद्धा आता भाजीपाला खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याच दिसून येतय. उन्हाचा प्रचंड तडाखा त्याचबरोबर पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन हे कमी होत असून मार्केटमध्ये सुद्धा त्याची आवक ही कमी झालेली असल्याने विक्रीवर परिणाम झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Panchang Today: आज शुक्र प्रदोष व्रताचा संयोग! मिथुनसह चार राशींसाठी लाभदायक दिवस

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT