Sambhajinagar Leopard News  Saam TV
महाराष्ट्र

Leopard: छत्रपती संभाजीनगरात बिबट्याची दहशत; मॉलमध्ये बिबट्या, शाळांनाही टाळं

Leopard: संभाजीनगर शहरातील माँलमध्ये बिबट्या दिसल्यानं शहरात खळबळ उडालीय . बिबट्याला पकडण्यासाठी ९० जणांचा पथक तैनात करण्यात आलं आहे.

Tanmay Tillu

संभाजीनगर शहरातील माँलमध्ये बिबट्या दिसल्यानं शहरात खळबळ उडालीय . संभाजीनगरच्या उल्कानगरीत बिबट्याने धुमाकूळ घातलाय...गेल्या तीन दिवसांपासून संभाजीनगरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे बिबट्या गेला कुणीकडे असा सवाल उपस्थित झालायं.

गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरात एका बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरा बाहेर पडणंही मुश्किल झालंय.. या बिबट्याची दहशत इतकी की, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनीही धसका घेतलाय. बिबट्याला शहरातल्या वेगवेगळ्या भागात पाहीलं गेलंय.

हा बिबट्या बुधवारी रात्री शहरातील एका मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला. हा मॉल सिडको परिसरात आहे. या बिबटयाचा एवढा धसका घेतलाय की उल्का नगरातली शाळाही बंद ठेवण्यात आलीय. शहराचा मध्य भागी असलेल्या उल्कानगरी भागात हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

बिबट्यासाठी या भागातही ट्रॅप लावण्यात आलेत.. सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं असून त्यासाठी सहा पथकं तयार करण्यात आली आहे. वन विभागाचे एकूण 100 कर्मचारी या मोहिमेत आहेत. एक पथक नाशिकवरून आले आहे. शिवाय गनमॅनचाही त्यात समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या वन विभागाच्या हाती लागलेला नाही. असं असलं तरी तीन दिवसानंतरही बिबट्याचा सुगावा लागलेला नाही.त्यामुळे बिबट्या मॉलमध्ये फिरुन पुन्हा जंगलात निघून गेला की काय अशीही शक्यता आहे. मात्र त्यामुळे शहर बिबट्याच्या दहशतीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Hospitalised: १०४ ताप, चेहरा थकलेला...; प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने केलं रुग्णालयात दाखल

Fresher Jobs : फ्रेशर्स आहात? जॉब शोधताय? असा Resume तयार केलात तर झटक्यात पास व्हाल Interview

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर संतापल्या

Cricketer wedding: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अडकला लग्नाच्या बेडीत; वयाने 7 वर्ष मोठ्या मुलीसोबत बांधली लग्नगाठ

तुमचं मूल फेसबुक, इन्स्टा वापरतंय? सरकार आणतेय नवा कायदा; पालकांची परवानगी नसेल तर...

SCROLL FOR NEXT