कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या अनोख्या कीर्तनाच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. इंदोरीकर महाराज यांच्या राहात्या घरात बिबट्या शिरला. महाराजांच्या घराबाहेरील शेडमध्ये असलेल्या एका कुत्र्याला शिकार बनवलं. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचे दृश्य कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. (Latest News)
संगमनेर तालुक्यातील ओझर गावात कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे घर आहे. महाराज यांच्या घरात बिबट्या घुसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. शेडमध्ये असलेल्या एका कुत्र्याला बिबट्याने उचलून नेलं आहे.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता दोन कुत्रे झोपलेले आहेत. तेवढ्यात तिथे अचानक बिबट्या येतो, त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढतो. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.