Aurangabad News डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्याने केला विषप्रयोग; २ बिबट्यांचा मृत्यू

विषप्रयोग करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर नंदलाल परदेशी असे आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे. तो सोयगाव तालुक्यातील पिंप्री माळेगाव येथे राहणारा आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण व्हावं म्हणून एका शेतकऱ्यानं विषप्रयोग केल्यानं एक बिबट्या मादी, एक नर बिबट्यासह (leopard) मादीच्या पोटात असलेले तीन पिल्लेही मृत झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. शवविच्छेदनानंतर ही धक्कादायक घटना माहिती समोर आली आहे. त्यानंतर विषप्रयोग करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर नंदलाल परदेशी असे आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे. तो सोयगाव तालुक्यातील पिंप्री माळेगाव येथे राहणारा आहे.

हे देखील पहा -

याप्रकरणी औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने विषप्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याचा नियमित जामिनाचाही अर्ज फेटाळला आहे. काही दिवसांपूर्वी सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्यावर एक मादी आणि एक नर बिबट्या गंभीर अवस्थेत पडून असल्याची माहिती वन विभागास मिळाली होती. त्यानुसार प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाच्या दोन्ही बिबट्यांना मृत घोषित केले. त्यानंतर बिबट्यांच्या शवविच्छेदन दरम्यान त्यावर विषप्रयोग झाल्याचे समोर आले.

तपासा दरम्यान ज्ञानेश्वर परदेशी या शेतकऱ्याने विषप्रयोग करून बिबट्यांना मारून कोल्हापुरी बंधाऱ्यावर आणून टाकल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ज्ञानेश्वर परदेशी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या चौकशीत बिबट्या शेतीचे नुकसान करीत असल्याने त्यावर विष प्रयोग समोर आले. या घटनेनं औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger Defence Stock: ६ महिन्यात पैसे दुप्पट; बाजारातील हटके स्टॉक, 5 वर्षांत लाखाचे झाले २४,२३,००० रुपये!

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

Crime: आई गावाकडे गेली, बापाने घेतला संधीचा फायदा; पोटच्या मुलीवर बलात्कार, डोकेदुखीमुळे रुग्णालयात गेली अन्...

Fraud Case : मंत्रालयात लिपिक पदासाठी घेतल्या मुलाखती; आमिष देत गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT