एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावं - जयंत पाटील

आमचे आमदार फुटणार नाही आणि फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही
जयंत पाटील
जयंत पाटील SaamTV
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई - एमआयएमनं महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्याची ऑफर दिली आहे त्यामळून राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हान देखील जयंत पाटील यांनी दिले आहे.

हे देखील पहा -

राजेश टोपे हे दुःखाच्या वेळी जलील यांच्याकडे गेले होते. त्यावेळी तात्यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. अशावेळी राजकीय चर्चा करणं हे राष्ट्रवादीची संस्कृती नाही. त्यामुळे अशा चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही असं देखील पाटील यावेळी म्हणाले.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी घरी जाऊन आम्हाला फोन केले. ते आमच्यावर खुश आहेत. त्यामुळे आमदार फुटणार नाही आणि फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील
Nagpur Election 2022: नागपूर मनपा निवडणूकीसाठी शिवसेनेची स्वबळाची तयारी

पुढे ते म्हणाले की, एमआयएम जर बी टीम नसतील, तर मग आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून आपल्या लक्षात येईल की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की भाजपाच्या विजयासाठी उत्सुक आहेत असे देखील ते म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com