Breaking News  
महाराष्ट्र

बालकास ताेंडात पकडून बिबट्याने ठाेकली धूम; आईने केला पाठलाग

या घटनेमुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संभाजी थोरात

कराड : कराड तालुक्यात ऊस तोडणी कामगाराच्या दोन वर्षांच्या मुलावर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. येणके येथी ही घटना घडली आहे. आकाश दिगास बिल असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. leopard attacks child nandurbar yenke near karad Breaking News

नंदुरबार जिल्ह्यातील धनगाव तालुक्यातील दिगास कुटुंब गेल्या काही दिवसांपासून कराड तालुक्यात वास्तव्यास आहे. ऊस तोडणी सुरू झाल्यापासून कराड तालुक्यातील अनेक गावांत प्राण्यांवर बिबटे हल्ले करीत आहेत.

ऊस तोडण्यासाठी आलेल्या कुटुंबासोबत आणलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. बालकास तोंडात घेऊन पळणा-या बिबट्याचा आईने पाठलाग केला. परंतु ताेपर्यंत त्याने शेतात धूम ठाेकली हाेती.

शाेधाध केल्यानंतर थाेड्या अंतरावर ग्रामस्थांना बालकाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. दरम्यान येणके भागात तातडीने वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी उपयायाेजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंच्या खासदाराची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये वीज कोसळून मेंढपाळासह 13 बकऱ्यांचा मृत्यू

Face Care: टॅनिंग आणि पिंपल्स खूप वाढलेत? मग आठवड्यातून ३ वेळा हा फेस पॅक नक्की लावा

Water Intake: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकतं?

Diabetes Symptoms: त्वचेवर दिसणारे 'हे' दोन डाग मधुमेह होण्याचे देतात संकेत

SCROLL FOR NEXT