Leopard prowling near human settlements Experts warn of potential rabies risk from infected prey Saam Tv
महाराष्ट्र

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Rabies Risk From Infected Wildlife: बिबट्यामुळे तुम्हाला रेबीज होऊ शकतो... होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरयं.... मात्र बिबट्यामुळे रेबीज कसा होणार? नेमकं प्रकरण काय आहे? तज्ज्ञाचं नेमकं काय म्हणणं आहे?

Suprim Maskar

राज्यभरात बिबट्यानं नुसता धुमाकूळ घातलाय... कधीकाळी शेतशिवारी दिसणारा बिबट्या थेट मानवी वस्ती घुसल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलयं... त्यातच बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय.. तर दुसरीकडे बिबट्याला जेरबंद करताना वनअधिकाऱ्यांसह स्थानिकांवरही बिबट्या हल्ला करतोय़....अशातच बिबट्यापासून माणसाला रेबीज होऊ शकतो... अशी धक्कादायक माहिती समोर आलीय... नेमकं प्रकरण काय आहे?

बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात भक्ष्य मिळत नसल्यानं मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला. बिबट्यांकडून कुत्र्यांची सर्वाधिक शिकार केली जातेय.. त्यात रेबीज झालेल्या कुत्र्यांची बिबट्यानं शिकार केल्यास बिबट्यालाही रेबीज होऊ शकतो... त्यामुळे जेव्हा तोच बिबट्या माणसावर हल्ला करेल तेव्हा बिबट्यापासून माणसालाही रेबीज होईल..

खरतंर रेबीजचा विषाणू संक्रमित प्राण्याच्या लाळेतून पसरतो आणि चाव्यानंतर तो विषाणू मानवी शरीरात प्रवेश करून मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे हल्ल्यातून झालेली जखम त्वरित स्वच्छ धुवून सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो...

सध्या तरी बिबट्याला रेबीज झाल्याचं प्रकरण समोर आलेल नसलं तरी बिबट्याला रेबीज होण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञाचं मत आहे...या दृष्टीने वनविभागानं तात्काळ मृत बिबट्यांची रेबीज तपासणी करायला हवी... त्याशिवाय बिबट्याला रेबीज होतो का? आणि त्यामुळे माणसालाही धोका आहे का? हे स्पष्ट होणार नाही....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रेकअप होताच बॉयफ्रेंडची सटकली; गर्लफ्रेंडच्या घरात जाऊन गोळ्या झाडल्या

Badlapur Crime: सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्येची उकल; डोके चक्रावून टाकणारं बदलापुरातील निरजा आंबेरकर हत्याकांड

बाहेर मैदान मोकळंय; भास्कर जाधव vs नितेश राणे विधानसभेत खडाजंगी,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची

महापालिका निवडणुकीआधी पुण्याच्या राजकारणात मोठा उलटफेर; मनसे आणि ठाकरे सेना...

SCROLL FOR NEXT