Nashik News Saamtv
महाराष्ट्र

Nashik: जेव्हा मांजर अन् बिबट्या विहिरीत पडतात, दोघांची पाण्यातच सुरू झाली लढाई; पाहा Video

सध्या सोशल मीडियावर या मांजराचा आणि बिबट्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख..

Nashik: नाशिक शहरासह ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही मागणी होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका मांजराचा आणि बिबट्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून हे दोन्ही प्राणी विहरीत पडल्याचे पाहायला मिळत आहे. (Nashik News Update)

समोर आलेल्या माहितीनुसार, मांजरीमागे लागलेला बिबट्या आणि जीव वाचवण्यासाठी धावत असलेली मांजर हे दोघे विहरीत पडले होते. सिन्नर तालुक्यातील तेंबुरवाडी,आशापूरमध्ये ही घटना घडली आहे. भक्षच्या शोधात असलेल्या बिबट्याने मांजरीवर झडप घातली होती. झडप घालत असतांना जवळच विहीर होती.

मात्र अंधारात ही बाब लक्षात न आल्याने मांजरीसह बिबट्या विहिरीत पडला. आज पहाटेच्या वेळेला हा संपूर्ण प्रकार घडला आहे. सध्या या मांजरीचा आणि बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मांजर आणि बिबट्या दोघे देखील विहिरीत पाणी जास्त असल्याने जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. विहिरीत असलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेऊन बिबट्या आपला जीव वाचवून बसल्याचे दिसून आले.

तर बिबट्यासोबत विहिरीत पडलेली मांजर देखील विहिरीचा कोपरा शोधून आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. पाण्यामध्ये दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू असल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान याबाबत तात्काळ वन विभागाच्या माहिती देण्यात आली त्यांनतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी अथक प्रयत्न करून विहिरीत पडलेला बिबट्या आणि मांजर या दोघांचे प्राण बचावले आहेत. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पिंजऱ्यातून घेऊन जाण्यात आले त्यांनतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

SCROLL FOR NEXT