Villagers protest after a 4-year-old girl dies in a leopard attack in Ahmednagar. saam tv
महाराष्ट्र

Leopard Terror in AhilyaNagar: जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत; बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Leopard Attack On 4-Year-Old Girl : बिबट आणि मानवी संघर्ष वाढू लागलाय. जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झालीय. बिबट्याच्या हल्ल्यात एका ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी महामार्गावर निदर्शने केली.

Suprim Maskar

  • नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची शोध मोहीम

  • बिबट्यांची दहशत ही आता पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्येही पसरलीय.

  • बिबट्याच्या दहशतीपासून कधी मुक्ती मिळणार?

जुन्नरनंतर बिबट्यानं आता अहिल्यानगरमध्ये दहशत पसरवलीय. शिरुरमधल्या चिमुकल्याचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आलं. मात्र आता अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय.संतप्त जमावानं मृतदेहासह नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत,काय उपाययोजना केली? असा सवाल उपस्थित केलाय.

दुसरीकडे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने शोध मोहीम हाती घेतली आहे. वनविभागाचा फौजफाटा टाकळी शिवारात दाखल झालाय. शेतामध्ये पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चिमुकलीच्या मृत्यूनं जागं आलेल्या वनविभागानं आता जनजागृतीसाठी व्हिडिओ जारी केलाय.

जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांच्या स्थलांतरासाठी सव्वा अकरा कोटींच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. मात्र बिबट्यांची दहशत ही आता पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्येही पसरलीय. त्यामुळे वनविभाग आणि प्रशासकीय यंत्रणा यावर तातडीनं उपाययोजना कधी करणार? नागरिकांना बिबट्याच्या दहशतीपासून कधी मुक्ती मिळणार? हा महत्वाचा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : कल्याणमध्ये मुलीला भेटायला आली, रिक्षाचालकाने महिलेला फसवले, तब्बल ₹३५०००० लाख लंपास केले

Zarine Khan Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचे निधन; राहत्या घरी अखेरचा घेतला श्वास

Maharashtra Live News Update: पदवीधर आमदार धीरज लिंगडे यांच्याकडूनच आदर्श आचारसंहितेचा भंग

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Pune News: पुण्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, पार्थ पवारांना अडचणीत आणणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT