सावकाराने महिलेला जबरदस्ती पाजले विष; परभणीतील संतापजनक घटना (पहा Video)
सावकाराने महिलेला जबरदस्ती पाजले विष; परभणीतील संतापजनक घटना (पहा Video) Saam Tv
महाराष्ट्र

सावकाराने महिलेला जबरदस्ती पाजले विष; परभणीतील संतापजनक घटना (पहा Video)

राजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: परभणी Parbhani जिल्ह्यात अवैध सावकारी संपण्याचा नावच घेत नाही. जिल्ह्यातील गंगाखेड Gangakhed येथे अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाने विष Poision प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील इटोली येथील साई नगर तांडा येथे महिलेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

हे देखील पहा-

जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरातील साई नगर तांडा येथे अवैध सावकारी करणाऱ्या सावकार व त्याच्या पत्नीने शेत परत का मागते म्हणून गिरीजा आडे या महिलेला विष पाजले. पीडितेला परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .

उपचार घेणाऱ्या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अवैध सावकारी करणारा सावकार आणि त्याच्या पत्नीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून , पुढील तपास परभणी पोलीस करत आहे .

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

Raigad Crime : मंदिरात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; चोरट्याने बांग्लादेशातील बँकेत वर्ग केली रक्कम

Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा हार; सोनाली दिसतेय फारच छान

SRH vs RR: हैदराबादचं वादळ रोखण्यासाठी काय असेल राजस्थानचा 'रॉयल' प्लान? अशी असू शकते प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT