बीड: छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न (पहा Video)

बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू..
शेवडी येथे 20 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
शेवडी येथे 20 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्याSaam Tv

विनोद जिरे

बीड: सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गुंदावडगाव येथे काल घडली आहे. सदरील मुलीवर बीडच्या शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा-

बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गुंदा वडगाव येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची गावातीलच मुलगा छेड काढत होता. त्याच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून, पीडित मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर पीडित मुलीवर बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या तिची स्थिती तब्येत स्थिर आहे.

शेवडी येथे 20 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
मध्य प्रदेश: चेटकिणीच्या संशयावरून काकुची तलवारीने गळा चिरून हत्या!

दरम्यान पिंपळनेर पोलिसांनी पीडित मुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली असून मुलीने जबाब दिला की गुन्हा दाखल होईल. अशी माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आघाव यांनी दिलीय. दरम्यान शहरी भागात होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर, आता ग्रामीण भागात शाळापर्यंत याचे पेव फुटल्याने आता शाळकरी मुलींच्या देखील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com