Gondia Corona Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Corona: नेत्यांच्या प्रचारसभा की कोरोनाचा हॉटस्पॉट, परवानगी 50 जणांची, गर्दी शेकडोंची

गोंदिया जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रजारसभाच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रजारसभाच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. नेत्यांच्या प्रचारसभेला 50 लोकांची परवानगी असताना शेकडोची गर्दी होत आहे. त्यामुळे नेते मंडळींच्या सभेतच कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं दिसून येत आहे (Leaders campaign become the corona hotspot in Gondia).

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी येत्या 18 जानेवारीला निवडणुका (Election) होणार आहेत. विविध पक्षांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या प्रजारसभाच कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरु लागल्या आहेत.

प्रशासनाकडून राजकीय सभेला 50 लोकांची परवानगी दिली असताना शेकडोची उपस्थिती सभेत होत आहे. कोरोना नियमांना हरताळ फासून कित्येकांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाहीये. तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रचारसभेतून दिसून आले आहे. मात्र, अद्याप कुणावरही कारवाई करण्यात न आल्याने सामान्य नागरीकांवर कारवाई आणि राजकीय नेत्यांना अभयष दिला जात आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT