विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज रायगडात Saam Tv
महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज रायगडात

पुरग्रस्त भागातील नागरिकांच्या पुनर्वसनाची करणार पाहणी, अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड :  रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपुर तालुक्याला बसलेल्या महापूराच्या फटक्यामुळे येथील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. महाड, पोलादपूर येथील नागरिकांचे प्रशासनामार्फ़त पुनर्वसन सुरु करण्यात आले आहे. या पुनवर्सनाची पाहणी करण्याकरिता आणि बाधित जनतेला आवश्यक गोष्टींच्या सहाय्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर घेणार आहेत.

हे देखील पहा -

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्याची सुरूवात पोलादपुर तालुक्यातील सुतारपाडा, गोवले, केवनाळे गावापासुन होणार आहे. या गावातील दरड कोसळुन झालेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी सकाळी ९.३० वाजता करणार आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दाभेकर यांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर महाड व्यापारी असोशिएन समवेत दुपारी १२.०० वाजता पुरात झालेल्या नुकसानसंदर्भात बैठक पार पडणार आहे.

मुसळधार पावसामुळे महाड तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुरग्रस्त भागातील नुकसानासंदर्भात दुपारी २.०० वाजता उपविभागीय अधिकारी व संबधित अधिकारी यांच्या समवेत महाड येथील नवेनगर तालुक्यात आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानतंर संध्याकाळी ४.०० वाजता महाड तालुका शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसेचा मेळावा; राज ठाकरे DJवर बोलणार?

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच HRA मध्येही मोठा बदल

Bread-Omelette : नाश्त्यात रोज ब्रेड-ऑम्लेट खाणं आरोग्यासाठी चांगलं की धोकादायक? आताच जाणून घ्या

Birthday Gift for Girlfriend: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला द्या सरप्राईज गिफ्ट; 'ती' होईल खुपच खूश

Palghar : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा, पालघरमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण भोवलं

SCROLL FOR NEXT