Police display 16 kg of seized ganja along with the vehicle used in smuggling during a major LCB operation in Dhule. saam tv
महाराष्ट्र

माणसाचा मेंदू निकामा करणारा १६ किलो गांजासह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; धुळे-शिरपूर महामार्गावर फिल्मी स्टाईलने रचला सापळा

Dhule Ganja Seizure 16kg Lcb Action Two Arrested: धुळे-शिरपूर महामार्गावर एलसीबीची मोठी कारवाई; १६ किलो गांजासह दोघांना अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य आरोपी फरार.

Omkar Sonawane

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे: मानवी मेंदूवर घातक परिणाम करणाऱ्या गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. धुळ्याहून शिरपूरकडे मारुती सुझुकी कारमधून घेऊन जाण्यात येणारा तब्बल १६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत गांजा आणि वाहनासह एकूण ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गुप्त माहितीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. एका मारुती सुझुकी कारमधून धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक केली जाणार असल्याचे या माहितीवरून स्पष्ट झाले होते. माहिती मिळताच एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी वेळ न घालवता तात्काळ एक विशेष पथक संबंधित मार्गावर रवाना केले.

१६ किलो गांजासह दोघे ताब्यात, मुख्य विक्रेता फरार

पथकाने धुळे-शिरपूर महामार्गावर सापळा रचून संशयास्पद मारुती सुझुकी कार अडवली. कारची झडती घेतली असता, पोलिसांना त्यात तब्बल १६ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी कारमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान हा गांजा धुळे शहरातीलच एका नामांकित इसमाकडून विकत घेण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांची कारवाई झाल्याचे समजताच धुळ्यातील संबंधित मुख्य गांजा विक्रेता सध्या फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

एलसीबीने जप्त केलेला गांजा, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि इतर साहित्याची एकूण किंमत अंदाजे ९ लाख १२ हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : सॉरी मम्मी-पप्पा... १७ वर्षीय मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Saturday Horoscope : सहकार्याच्या साथीने समस्या सुटतील, 5 राशींचे नशीब चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Monsoon Session Bill: मोठी बातमी ! वंदे मातरम्’चा अपमान केल्यास होणार तुरुंगवास; सरकार आणणार कठोर कायदा

Maharashtra News Live Update: देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदेंकडे द्यावी - संजय गायकवाड

Silver Chain Design: दिसायला क्लासी आणि किंमतही बजेटमध्ये, चांदीच्या चैनच्या 'या' 7 आकर्षक डिझाईन्स एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT