Crime News Saam tv
महाराष्ट्र

नवापूर काॅलेज रोडावर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यास अटक; एलसीबीची कारवाई...

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे.

दिनू गावित

नंदुरबार - नवापूर शहरात काॅलेज रोडावर एक व्यक्ती सुका गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना (Police) मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत कारवाई करायला सुरुरवात केली. सुका गांजा एका प्लास्टिक पिशवीत विक्री करत असलेला व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे असलेला साडेआठ हजार किंमतीचा एक किलो सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली आहे.

गांजा तस्करी करणारा नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात राहणारा 62 वर्षीय शेख गब्बान शेख अरमान याला ताब्यात घेतले असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहराच्या प्रवेशद्वारा जवळच शहरातील सर्वात मोठ्या महाविद्यालयाच्या गेटवरच चक्क गांजा विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जितेंद्र तोरवणे, जितेंद्र ठाकूर, तुषार पाटील, संजय रामोळे, आनंदा मराठे, दिनेश लाळकर आदींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT